धर्माभिमानाच्या अभावामुळे किंवा मुसलमान बंदीवानांच्या दबावामुळे हिंदु बंदीवान अशा प्रकारे रोजा पाळतात. हिंदु बंदीवान बहुसंख्य असलेल्या किती कारागृहांत मुसलमान हिंदूंचे सण पाळतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : येथील जिल्हा कारागृहातील ६५ हिंदु बंदीवानांंनी १ सहस्र १५० मुसलमान बंदीवानांंसोबत रमझान मासाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत रोजा पाळला, अशी माहिती कारागृह अधीक्षक सतीश त्रिपाठी यांनी दिली.
प्रशासनाने प्रसारित केलेल्या नवीन माहितीनुसार रोजा पाळणार्या हिंदु बंदीवानांची संख्या आता १०१ वर पोहोचली आहे. (हिंदूंना यासाठी बळजोरी करण्यात आली कि त्यांनी स्वखुशीने रोजा पाळला ? मुसलमानांनी हिंदु बंदीवानांसोबत हिंदूचा सण कारागृहात साजरा केला, अशी घटना कधी घडली आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
रोजा पाळणार्या बंदीवानांसाठी कारागृह व्यवस्थापनाने नमाज पढण्यासाठी, तसेच सकाळचा अल्पाहार आणि संध्याकाळचा इफ्तार यासाठी विशेष व्यवस्था केली होती. रोजा ठेवणार्यांसाठी फळे, खजूर, ५०० ग्रॅम दूध आणि इतर फराळाचे पदार्थ यांची व्यवस्था कारागृहाच्या वतीने करण्यात आली आहे. (आपल्या भारतात योगासने करतांना ॐ चा उच्चार करायला सांगितल्यास धर्मांध आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले यांना पोटशूळ उठतो; पण त्यांना रमझानच्या निमित्ताने कारागृहात कैद्यांसाठी विशेष व्यवस्था केलेली चालते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात