सातारा : गोवंशियांच्या हाडांची वाहतूक करणारा आयशर ट्रक वाई येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर रायगाव फाट्याजवळ पकडला. हा ट्रक भुईंज पोलिसांच्या कह्यात दिला असून त्यांच्यावर गोवंशियांच्या हाडांची वाहतूक करण्यासंबंधिची कलमे लावून गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.
वाई येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सागर मालुसरे, संदीप जायगुडे, बंटी जाधव आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. या सर्वांना कार्यकर्त्यांकडून गोवंशाच्या हाडांची वाहतूक करणार्या ट्रकविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बंगलोरहून गुजरातकडे गोवंशियांच्या हाडांची वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला. त्यात गोवंशियांचे हाडे असल्याचे लक्षात येताच कार्यकर्त्यांनी तो ट्रक भुईंज पोलिसांच्या कह्यात दिला. (असे जागरूक गोरक्षकच हिंदु धर्माची शक्ती आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
भुईंज पोलिसांनी ट्रक चालक महंम्मद अली हुसेन मोरसवाला आणि त्याचा सहकारी नजर मोहमद्दी झारो (रा. उदयपूर, गुजरात) यांच्याकडे वाहतूक परवाना आणि अन्य कागदपत्रांची मागणी केली; मात्र त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे उपब्ध होऊ शकली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर गोवंशियांच्या हाडांची बेकायदा वाहतूक आणि महाराष्ट्र प्राणि संरक्षण सुधारणा कायदा कलम ५ क आणि ६ प्रमाणे भुईंज पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात