Menu Close

वीरभूम : पत्नी काळी होती म्हणून नासीर याने कुटुंबीयांच्या सहाय्याने तीला जिवंत जाळले !

muslim

वीरभूम : पश्चिम बंगालच्या वीरभूमे सून काळी आहे, आपल्या मुलाला तिच्यापेक्षा चांगली दिसणारी व गोरी मुलगी मिळावी म्हणून सासरच्यांनी मुलाच्या मदतीने सूनेला जिवंत पेटवून तिची हत्या केली आहे.

पीडित सोमेरा बीबी (२२) हिने मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या साक्षीतून हे वास्तव पुढे आले आहे. नासीर याने तीन वर्षांपूर्वी १ लाख रोख आणि काही जमिनीच्या बदल्यात सोमेराशी लग्न केले होते. पण सोमेराचा रंग काळा असल्याने नासीर व त्याचे कुटुंब तिला सतत त्रास देत. इथे राहायचे असेल तर माहेरच्यांकडून पैसे आण, असा तगादा सोमेराकडे लावला जाई. सोमेराच्या आई-वडिलांनी मुलीसाठी अनेकदा पैशाच्या मागण्या मान्य केल्या. त्यासाठी स्वत:ची जमीनही विकली. पण, सोमेराच्या सासरकडून मागण्या सुरूच होत्या.

सहा महिन्यांपूर्वीच सोमेराच्या सासरकडच्यांनी घर बांधण्यासाठी तिच्याकडे २ लाख रुपयांची मागणी केली. मात्र, आता ते शक्य नसल्याने सोमेराने त्यांना विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या नासीर, त्याची आई आणि तीन भावांनी मिळून तिला एका खोलीत कोंडले आणि अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. सोमेराच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावत आले, तेव्हा तिची सासू व नवरा तिथून पळून गेले होते. शेजाऱ्यांनी जखमी सोमेराला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, ती बरीच भाजली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी नासीर शेख व त्याचे भाऊ फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *