Menu Close

बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या

  • भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यात आल्यावर अन्य धर्मियांचे काय होणार ?, असा प्रश्‍न विचारणारे कधी इस्लामी राष्ट्रांत हिंदूंचे काय होत आहे, याकडे लक्ष का देत नाहीत आणि त्यावर तोंड का उघडत नाहीत ?
  • हिंदूंनो, बांगलादेशात हिंदूंचा होत असलेला शिरच्छेद उद्या भारतातही होऊ लागण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  • जगभरात कार्य करणार्‍या हिंदुत्ववादी संघटना याविरोधात काहीच का बोलत नाहीत ?
  • हिंदूंनो, अशा बातम्या वाचून झोपू नका, तर स्वरक्षणार्थ संघटित व्हा ! – संपादक, हिंदुजागृती
nityaranjan_pandey
नित्यरंजन पांडे

ढाका : हिंदू पुजाऱ्याच्या हत्येला तीन दिवस उलटत नाहीत तोच बांगलादेशात काल नित्यरंजन पांडे या ६० वर्षीय हिंदूची निर्घृण हत्या करण्यात आली. लागोपाठच्या या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

नित्यरंजन पांडे हे बांगलादेशातील पाबनातील हिमायतपूर येथील ठाकूर अनुकुल चंद्र सत्संग परमतीर्थ हिमायतपूरधाम आश्रमाचे कर्मचारी होते. गेल्या ४० वर्षांपासून ते आश्रमात स्वयंसेवक म्हणून काम करत होते. आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता काही अज्ञात इसमांनी त्यांना गाठले आणि त्यांच्या मानेवर धारदार शस्त्रांचे वार केले. त्यात पांडे यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

इस्लामी राष्ट्र असलेल्या बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक, धर्मनिरपेक्षतावादी व बुद्धिवाद्यांवर हल्ले होत आहेत. आयसिसच्या प्रभावाखाली असलेल्या दहशतवादी संघटनांकडून हे हत्यासत्र सुरू असल्याचा संशय आहे.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स  

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *