Menu Close

उत्तरप्रदेशच्या कैरानामधील बहुसंख्य धर्मांधांच्या अत्याचारांमुळे ३४६ हिंदु परिवारांचे पलायन !

उत्तरप्रदेश दुसरे काश्मीर होण्याच्या मार्गावर !

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते की, जेथे हिंदू अल्पसंख्यांक आहेत, तेथे धर्मांधांकडून त्यांच्यावर आक्रमण झाले, तर जेथे धर्मांध अल्पसंख्यांक आहेत, तेथील बहुसंख्य हिंदूंनी त्यांना धडा शिकवला, तरच अल्पसंख्य हिंदूंचे रक्षण होईल !
  • संपूर्ण देशात हिंदू अल्पसंख्यांक झाले, तर पाक आणि बांगलादेश येथे हिंदूंची जी स्थिती आहे, तीच भारतातही होईल, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

लक्ष्मणपुरी (लखनौ) : उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना विधानसभा क्षेत्रात धर्मांधांच्या अत्याचारांमुळे गेल्या २ वर्षांत ३४६ हिंदु परिवारांनी पलायन केले आहे. एकेकाळी ५४ टक्के असणारे मुसलमान येथे आता ९२ टक्के झाले आहेत, अशी माहिती झी न्यूज वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहे. या संदर्भात शामलीचे भाजपचे खासदार हुकूम सिंह यांनी विधान केले आहे.

शामली नगरपालिका परिषदेच्या सभागृहात पत्रकारांशी बोलतांना खासदार हुकूम सिंह यांनी म्हटले आहे की,

१. कैरानामधून ३४६ हिंदु परिवारांना पलायन करावे लागले, तर उर्वरित हिंदू जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

२. यापूर्वी केवळ २५० हिंदु परिवारांच्या पलायनाची माहिती होती; मात्र त्यात आता वाढ झाली आहे. पलायन करणार्‍या हिंदु परिवारांची सूची करण्यात आली आहे.

३. या हिंदूंकडून सातत्याने खंडणी मागण्यात येत होती. खंडणी न देणार्‍या ४ हिंदु व्यापार्‍यांच्या हत्याही करण्यात आल्या. हिंदु महिलांच्या अब्रूवरही हात टाकण्यात येत आहेत. यामुळे घाबरलेले हिंदू पलायन करत आहेत. राज्यात समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून धर्मांधांना जोर आला आहे.

४. हिंदूंनी पोलिसांकडे तक्रारी करूनही त्यांचे संरक्षण करण्यात आले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *