काश्मीरमध्ये मुसलमान बहुसंख्य, तर हिंदू अल्पसंख्य आहेत. तेथील मुसलमानांची लोकसंख्या ९७ टक्के, तर काश्मीरच्या खोर्यात हिंदू आणि शीख यांची एकत्रित लोकसंख्या केवळ २.५ टक्के आहे. तेथे बौद्धांची संख्याही अत्यल्पच आहे. आतंकवादामुळे तेथील ३.५ लाख काश्मिरी पंडितांना विस्थापित व्हावे लागले आहे. ते आजही हालाखीचे जीवन जगत आहेत. या धगधगत्या समस्येवर साप्ताहिक चित्रलेखाने प्रकाशझोत टाकला. हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
आतंकवाद्यांच्या भीतीने ३.५ लक्ष काश्मिरी परागंदा !
वर्ष १९८९ मध्ये काश्मीर खोर्यात खर्या अर्थाने दहशतीला प्रारंभ झाला. आतंकवादी कारवाया, त्यांच्याकडून मिळणार्या धमक्या आदींमुळे
१. वर्ष १९८९ मध्येच ३.५ लक्ष काश्मिरी पंडितांनी जिवाच्या भीतीने काश्मीर सोडले.
२. किमान ५ लक्ष स्थानिक काश्मिरी पंडितांना त्यांच्या पूर्वजांची भूमी आणि शेती यांवर पाणी सोडावे लागले.
३. अनेकांनी जम्मू सोडून देशाच्या इतर भागांत त्यांचे बस्तान बसवले, तर काहींनी जम्मू किंवा अन्य ठिकाणच्या विस्थापितांच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला. ते तेथे वर्षांनुवर्षे रहात आहेत.
४. अनेकजण बंद पडलेल्या जुन्या शाळांमध्ये आश्रयाला आहेत, तर काहींनी नद्यांच्या किनारी तंबू ठोकले आहेत.
काश्मिरी पंडितांना परतण्याचे राज्यसरकारचे तोंडदेखले आवाहन !
राज्यसरकार विस्थापित काश्मिरी पंडितांना पुन्हा त्यांच्या घरी परतण्याचे आवाहन करते खरे; मात्र सुरक्षिततेची निश्चिती देत नाही ! विस्थापित काश्मिरी पंडितांची मूळ घरे इतरांच्याच कह्यात आहेत. तेथे परतल्यावर त्यांच्यासमोर अधिकाराच्या घरासह पोटापाण्याचा मोठा प्रश्न आहे. अशा वेळी कुठल्याही सरकारने त्यांच्यासाठी सुरक्षित नगर वसवण्याचा प्रयत्न केला नाही. मग काश्मिरी नागरिक परतणार तरी कसे ? आजच्या घडीला काश्मीरच्या खोर्यात केवळ ८०८ काश्मिरी पंडित जीव मुठीत धरून रहात आहेत. तेही कधी काश्मीर सोडून जातील, याची शाश्वती नाही.
फुटीरतावाद्यांच्या संपर्कात असणारे काश्मीरमधील देशद्रोही नेते !
काश्मीरमध्ये आज असेही काही नेते आहेत, ज्यांना केंद्रशासनाने सुरक्षा पुरवली आहे; पण त्यांना सत्तेपासून लांब रहावे लागल्यामुळे त्यांनी फुटीरवादी गटांद्वारे पुन्हा एकदा काश्मीरमधील वातावरण तापवण्यास प्रारंभ केला आहे. त्यांना पाकमधून पाठबळही मिळत आहे. हेच नेते आणि त्यांचे पक्ष काश्मीरमध्ये अशांतता वाढवत आहेत.
काश्मीरमधील अशांततेला राज्यकर्तेच कारणीभूत !
खरेतर काश्मीरमधील या अशांततेला तेथील राज्यकर्तेच कारणीभूत आहेत; कारण…
१. नवे सत्ताधीश स्वत:च्या पद्धतीने नवे नियम राबवायला प्रारंभ करतात.
२. ते कधी फुटीरवाद्यांशी, तर कधी पाकमधील आतंकवादी गटांशी चर्चेची गुर्हाळे चालवतात.
३. काश्मीर खोर्यातील परिस्थितीत किंचितशी सुधारणा झाली, की लगेचच सीमेवरील सुरक्षा दल आणि सैन्य यांच्या कपातीची घोषणा केली जाते.
राजकीय नेत्यांच्या याच अपरिपक्व खेळीमुळे काश्मीरचे खोरे कायम अशांत राहिले आहे. ती अशांतता भारतासाठी धोकादायक ठरली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात