Menu Close

बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितली आपबिती, दिग्दर्शक अल्ताफ मर्चेट डग्स देऊन करायचा बलात्कार

alfat_merchant

मुंबई : बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने दिग्दर्शक अल्ताफ मर्चेंट याच्यावर बलात्कारचा आरोप केला आहे. ३२ वर्षीय अभिनेत्रीने वांद्रे पोलिस ठाण्यात अल्ताफ यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

अल्ताफ मर्चेटने आपले आयुष्य उद्‍धवस्त केले आहे.अल्ताफ ड्रग्स देऊन क्रूर अत्याचार करत असल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये पीडिता व अल्ताफ आेळख झाली होती. पहिल्या भेटीतच अल्ताफने पीडितेला बॉलिवूडमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले होते.

पीडितेने सांगितले की, अल्ताफ मर्चेंटने तिला ड्रग्स घ्यायला सांगितले. त्याचे ऐकून ड्रग्स सेवन केले. ड्रग्सच्या नशेत तो मला रुममध्ये घेऊन जायचा व माझ्यावर बलात्कार करायचा. असे एकदा नव्हे तर अल्ताफने अनेक वेळा बलात्कार केला.

पीडितेने सांगितले की, एप्रिल २०१५ मध्ये ती अल्ताफच्या ड्राव्हरमध्ये ड्रग्स शोधत होती. तेव्हा तिला दुसर्‍या महिलांचे अश्लील फोटोज व सीडी सापडली. तेव्हा अल्ताफचा खरा चेहरा समोर आला. त्यानंतर ती मुंबईतून चंदीगडला परत आली. नंतर अल्ताफने फोनकरून धमकी देखील दिली.

अभिनेत्रीने सांगितले की, आता ती ड्रग्सशिवाय राहू शकत नाही. ड्रग्सचे व्यसन सोडण्यासाठी ती उपचार घेत आहे. पोलिसांनी नराधम अल्ताफ मर्चेट अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, असेही पीडीतेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

संदर्भ : दिव्य मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *