Menu Close

इफ्तारच्या आधी जेवल्याने पाकमध्ये ९० वर्षीय हिंदु वृद्धाला मारहाण !

पाकमधील मुसलमानांचा सर्वधर्मसमभाव !

भारतातील पुरोगामी आणि निधर्मी यावर काही बोलणार नाहीत; कारण मारणारे मुसलमान, तर मार खाणारा हिंदु आहे !

इस्लामाबाद : पाकमधील सिंधमध्ये इफ्तारच्या आधी अन्नसेवन केल्यामुळे एका ९० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या हिंदु नागरिकाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. (इफ्तार हे मुसलमानांचे व्रत आहे. त्याच्याशी हिंदूंचा काहीही संबंध नाही. तरीही पाकमध्ये हिंदूंवर असे अत्याचार करण्यात येतात. भारतात दादरीच्या प्रकरणावरून हिंदूंना असहिष्णु ठरवणारे आणि पुरस्कार परत करणारे पाकमधील या घटनेचा निषेध करणार कि नाही ? कि पाकमधील धर्मांधांना सहिष्णु म्हणणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. घोटकी जिल्ह्यातील हयात पिताफी या गावामधील रहिवासी असलेले गोकल दास यांना येथील पोलीस हवालदार अली हसन हैदरानी आणि त्याचा भाऊ मीर हसन यांनी प्रचंड मारहाण केली.

२. दास हे सायंकाळी ६.३० वाजता घरात बसून जेवत होते. इफ्तार आरंभ होण्यास अजून ४० मिनिटांचा अवकाश होता. त्यामुळे दास यांना जेवतांना पाहून अली हसन हैदरानी आणि त्याचा भाऊ मीर हसन यांनी गोकल दास यांना भूमीवर फेकून देत अत्यंत निर्दयतेने मारहाण केली.

३. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यावर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *