हिंदूशी विवाह करणार्या ख्रिस्ती महिलेचा मरणानंतरही दुःस्वास करणारे ख्रिस्ती म्हणे समतावादी !
पाटलीपुत्र (पाटणा) : अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या ९४ वर्षीय आजीचे ३ जूनला निधन झाले होते. मधु जोत्सना अखौरी असे नाव असलेल्या प्रियांकाच्या आजी स्वातंत्र्यसैनिक आणि जमदेशपूर शहराच्या माजी आमदार होत्या. ती लग्नापूर्वी मेरी जॉन नावाची ख्रिस्ती महिला होती. तिची अंतिम इच्छा होती की, तिचा मृतदेह तिच्या केरळमधील कोट्टायाम येथील कुमाराकॉम या मूळ गावातील सेंट जॉन अट्टमंगलम् चर्चच्या कब्रस्तानात पुरला जावा. (अन्य धर्मियांनी हिंदु धर्मातील व्यक्तीशी विवाह केला, तरी ते त्यांची त्यांच्या मूळ धर्माशी असलेली नाळ तोडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यासाठी प्रियांका चोप्राने केरळमध्ये जाऊन या चर्चकडे अनुमती मागितली; मात्र चर्चने अनुमती नाकारल्याने अन्यत्रच्या कब्रस्तानात त्यांचा मृतदेह पुरण्यात आला. ही माहिती स्वतः प्रियांका चोप्राने यांनी दिली. चर्चची ही कृती चुकीची असली, तरी आपण त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे प्रियांकाने म्हटले.
चर्चने म्हटले होते की, मधु जोत्सना यांनी एका हिंदु कुटुंबातील व्यक्तीशी विवाह केला होता. त्यामुळे ख्रिस्ती परंपरेनुसार त्यांचा मृतदेह पुरण्यास अनुमती देता येणार नाही; मात्र कोट्टायाम येथील जॅकोबाइट सीरियाई ख्रिश्चन चर्चचे बिशप थॉमस मार थेमोथिइस यांनी सेंट जॉन अट्टमंगलम् चर्चच्या कृतीला अयोग्य म्हटले आहे. ते म्हणाले की, मधु जोत्सना यांची अंतिम इच्छा पूर्ण न करणे हे मानवतेच्या विरोधात आहे; तसेच ख्रिस्ती परंपरेच्याही विरोधात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात