Menu Close

स्त्रियांनो, आपल्या शीलातच श्रेष्ठत्व आणि सौंदर्य आहे, हे जाणा ! – सौ. मीना रावत, महिला राज्य कार्यकारणी सदस्या, पतंजली योग समिती

kalyan_ranragini
डावीकडून सौ. नंदिनी सुर्वे, सौ. तन्वी सरमळकर, सौ. मीना रावत, कु. प्रतीक्षा कोरगावकर

कल्याण : नारी म्हणजे जो किसी से ना हरी वह नारी म्हणून तिला नारी म्हणतात. शौर्य आणि पराक्रम यांचे स्वरूप झाशीची राणी आहे; पण आजच्या स्त्रिया पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्याने तिला विसरल्या आहेत. आपली भाषा, वेशभूषा या देवीदेवतांप्रमाणे आहेत; पण त्याविषयी समूजन न घेतल्याने आपणच भारतीय संस्कृतीचा अवमान करत आहोत. इतर देशातील लोकांनी आपले अनुकरण केलेले नाही; पण आपण त्यांचे अनुकरण करतो. आपल्या शीलातच श्रेष्ठत्व आणि सौंदर्य आहे, हे लक्षात घ्या, असे मार्गदर्शन पतंजली योग समितीच्या महिला राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. मीना रावत यांनी केले. राणी लक्ष्मीबाई बलीदानदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आयोजित रणरागिणी महिला शाखेचा येथे आरंभ झाला. त्या वेळी सौ. रावत बोलत होत्या. या कार्यक्रमाला १०० महिला उपस्थित होत्या.

kalyan_ranragini_upastiti

आतंकवादाचे नवे रूप म्हणजे लव्ह जिहाद ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा

२३ वर्षांची रणरागिणी रणांगणात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढली. तीन दिवस तिने अखंड युद्ध केले. शीलाचे रक्षण करण्यासाठी बलीदान दिले. आता कुठे गेली ती आग झाशीच्या राणीची ? लव्ह जिहाद हा शब्द आज कित्येक स्त्रियांना ठाऊकही नाही. आतंकवादाचे नवे रूप म्हणजे लव्ह जिहाद. लव्ह जिहादमध्ये आजपर्यंत २ लाख स्त्रिया फसल्या आहेत. सर्वच गुन्ह्यांमध्येही महिला पुढे आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे धर्मशिक्षणाचा अभाव. ही स्थिती पालटण्यासाठी रणरागिणी निर्माण होणे काळजी आवश्यकता आहे. या वेळी समितीच्या सौ. नंदिनी सुर्वे आणि सनातन संस्थेच्या सौ. तन्वी सरमळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कु. तपस्या गांगुर्डे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बिरुदावली देत घोषणा दिली.

२. सनातनच्या सौ. सुनीता पाटील यांनी शनिशिंगणापूर येथे मंदिररक्षणाचा लढा आणि लव्ह जिहाद यांच्याविषयीचे अनुभव कथन केले.

३. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. तेव्हा उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला. ६० वर्षे वयाच्या एका आजींनीही प्रशिक्षण करू शकेन का, अशी विचारणा केली.

सहभागी हिंदुत्ववादी संघटना

कल्याण महिला मंडळ, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भाजप, राम उपासना केंद्र, राष्ट्रसेविका समिती, हस्ते क्लब, सिद्धेश्‍वर आळी

रहिवाशी संघ उपस्थित मान्यवर

भाजपच्या सरचिटणीस सौ. प्रिया शर्मा, भाजपच्या सचिव सौ. मंगल वाघ, भाजपचे शहर चिटणीस सौ. मंदा देशमुख, भाजपा उपाध्यक्ष सौ. मनीषा देशमुख, भाजपा कल्याण महिला शहर आघाडीच्या सरचिटणीस सौ. हेमा पवार

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *