धार्मिक भावना दुखावल्याचा मुसलमानांचा दावा !
धार्मिक भावना दुखावल्यावर मुसलमान थेट कायदा हातात घेतात, तर हिंदू निवेदने देतात, यावरून कोण सहिष्णु आहेत, हे पुरोगामी आणि ढोंगी निधर्मी सांगतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
लक्ष्मणपुरी : उत्तरप्रदेशची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील इमामवाड्यासमोर ११ जूनला एका गाण्याचे चित्रीकरण चालू असतांना ५० मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात अभिनेता कुणाल खेमू घायाळ झाले. तसेच चित्रीकरणाचे कॅमरे तोडण्यात आले. मुसलमानांचे म्हणणे होते की, इमामवाड्याच्या बाहेरील नौबतखाण्यात अशा प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणारे चित्रीकरण करण्यात येऊ नये.
आक्रमणापूर्वी मुसलमानांनी चित्रीकरणाच्या वेळी वाद घालून विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी आक्रमण केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या चित्रीकरणाची अनुमती घेण्यात आली नव्हती. घटनेनंतर येथे मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात