हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न !
गाजियाबाद (उत्तरप्रदेश) : देशात हिंदूंवर होणार्या अत्याचारांकडे लक्ष वेधण्यासाठी देहलीच्या कालिका शक्तिपीठाचे महंत श्री सुरेंद्रनाथ अवधूत, गाजियाबादच्या श्री दुधेश्वरनाथ मठाचे संत स्वामी नारायण गिरीजी महाराज आणि डासना येथील यती नरसिंहानंद सरस्वती यांनी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि विश्व हिंदु परिषदेचे डॉ. प्रवीण तोगाडिया यांना पत्र लिहिले आहे.
१. पत्रामध्ये समान नागरी कायदा आणि कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याची मागणी करण्यात आली आहे.
२. हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येमुळेच हिंदूंना धर्मांधांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. म्हणून शासनाने तात्काळ हे कायदे बनवायला हवेत.
३. कठोर लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी १९ जूनला देहलीच्या जंतरमंतर येथे विशाल धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान आणि सरसंघचालक यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
४. संत म्हणाले की, मोदी यांना संत आणि भक्त यांच्या भावना समजल्या पाहिजेत.
५. धर्माचे रक्षण संत करणार नाहीत, तर कोण करणार ? आज देशात अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण करण्यात येत असल्यानेच देशाचा विनाश होत आहे आणि त्याला संतांची उदासीनताही उत्तरदायी आहे. जर संत केवळ नेत्यांवर टीकाच करत राहिले, तर ते त्यांचे कर्तव्य पार पाडत नाहीत. हा देश, धर्म आणि समाज यांचा विश्वासघात आहे. पुढील पिढी संतांना क्षमा करणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात