Menu Close

अमेरिकेवर हल्ला केलात तर तुम्ही कधी सुरक्षित नाही राहणार, ओबामांची इसिसला धमकी

obama_isis

वॉशिंग्टन : ‘इराक आणि सिरियामधून इसीसचे अस्तित्व कमी होत असून परदेशी हल्लेखोर या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्याचे प्रमाणही कमी झाल्याचा’, दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. ‘इसीस आपली जमीन गमावत आहेत. सोबतच या दहशतवादी संघटनेला जिवंत ठेवण्याचा महत्वाचा वाटा असलेला पैसा मिळणेही बंद झाले असल्याचे’, बराक ओबामा बोलले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा टीमसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना बराक ओबामा यांनी हे वक्तव्य केले आहे.

‘आपण त्यांच्या तेलसाठ्यांच्या ठिकाणावर केलेल्या हल्ल्यांमुळे महिन्यामागे त्यांना मिळणारा लाखो डॉलर्सचा महसूल आपण रोखला आहे. पैसे ठेवण्याची त्यांची ठिकाणेही आपण उद्ध्वस्त केली आहेत, ज्यांमुळे त्यांचे आर्थिक नुकसान वाढले असल्याचेही’, बराम ओबामा बोलले आहेत.’ इसीसला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मिळणारी आर्थिक मदतही मिळणे बंद झाली असल्याचा’, दावा बराक ओबामांनी केला आहे.

‘इसीसकडचा पैसा संपत असल्याने संघटनेसाठी काम करणा-यांच्या पगारांमध्येदेखील कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या कैदेत असलेल्यांची सुटका करण्यासाठी जास्तीत जास्त खंडणी मागितली जात आहे. आपल्या काही लोकांनी सोने आणि पैसे चोरताना पकडल्याची कबुली स्वत: इसीसने दिली आहे. त्यांचे खरे रुप पुन्हा एकदा समोर आले आहे. हे धर्मासाठी लढत नसून चोर आहेत’, असे बराक ओबामा बोलले आहेत.

‘इसीसशी लढा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराची अतिरिक्त तुकडी ज्यामध्ये स्पेशल फोर्सचादेखील समावेश असेल सिरियामधील स्थानिक सैन्याला मदत करेल. अतिरिक्त सल्लागार इराक सुरक्षा यंत्रणेसोबत जास्तीत जास्त काम करतील. जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. उत्तर इराकमधील स्थानिक सैन्याला लढाऊ हेलिकॉप्टरपासून ते इतर सर्व मदत पुरवली जाईल’, असे आश्वासन बराक ओबामांनी दिले आहे.

‘इसीसच्या महत्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत १२० हून जास्त इसीसच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याचा’, दावा बराक ओबामांनी केला आहे. ‘आमचा संदेश स्पष्ट आहे. जर तुम्ही अमेरिका आणि आमच्या साथीदारांना टार्गेट केल तर तुम्ही कधीच सुरक्षित राहणार नाहीत’, अशी धमकीही दिली आहे.

संदर्भ : लोकमत

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *