बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे हिंदु जनजागृती समितीप्रणित ‘रणरागिणी’ शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस वीरश्रीयुक्त वातावरणात प्रारंभ !
बार्शी (जिल्हा सोलापूर) : राष्ट्र-धर्म रक्षणासाठी हिंदु महिलांनी धर्माचरणी व्हावे, धर्मावरील आघात रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम व्हावे, यासाठी चित्रपटांतील अभिनेत्रींचा नव्हे, तर ऐतिहासिक वीरांगनांचा आदर्श समोर ठेवायला हवा, असे मत रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हा संघटक सौ. सुनीता दीक्षित यांनी व्यक्त केले. या वेळी अश्लीलता, ‘लव्ह जिहाद’, धर्मपरंपरांना विरोध यांसारख्या धर्मावरील आघातांच्या विरोधात रणरागिणींनी रणशिंग फुंकले.
हिंदु राष्ट्र निर्मितीच्या व्यापक ध्येयाने प्रेरित होऊन रणरागिणीच्या बार्शी शाखेच्या धर्मपरंपरा रक्षण चळवळीस प्रारंभ झाला. या वेळी भारताला पुन्हा विश्वगुरुपदी विराजमान करण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत रहाण्याची शपथ रणरागिणींनी घेतली. हा कार्यक्रम १२ जून या दिवशी सायंकाळी ५ वाजता पार पडला. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी उपस्थित होत्या.
सौ. राजश्री तिवारी यांच्या हस्ते झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवर वक्त्यांचा सन्मान श्री वेदवेदांत समितीच्या सौ. रेखा जिकरे यांनी केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात