Menu Close

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

२१ जूनच्या योगदिनी ॐ बंधनकारक करणे आणि काश्मीरचे होणारे इस्लामीकरण रोखणे यांसाठी देहलीत राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

Delhi_RHA_june
जंतरमंतर येथे आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू

नवी देहली : देहलीच्या जंतरमंतर येथे १२ जून या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी २१ जूनच्या योगदिनी ॐ उच्चारणे बंधनकारक करावे आणि काश्मीरचे होणारे इस्लामीकरण रोखावे, अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाच्या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांनी खोट्या आरोपांतर्गत साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली. या वेळी वैदिक उपासना पीठ, अखंड भारत मोर्चा, भारत रक्षा मंच, योग वेदांत सेवा समिती, हिंदु डिफेंस लीग, सनातन संस्था, आणि हिंदु जनजागृती सtमिती यांचा सहभाग होता.

जम्मू-कश्मीरमध्ये काश्मीर फोर्ट फेस्टिवलच्या विज्ञापनात ऐतिहासिक तीर्थस्थान हरि पर्वतचे नाव कोह-ए-मारन प्रकाशित करण्यात आले होते. अनंतनागचे इस्लामाबाद, शंकराचार्य पर्वताचे तख्त-ए-सुलेमान आदी नावे पालटण्याचा प्रयत्न म्हणजे काश्मीरचे इस्लामीकरण करणे आहे, असे विचार या वेळी मांडण्यात आले. या वेळी भारत रक्षा मंचचे अधिवक्ता ज्ञानप्रकाश आणि हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. सुरेश मुंजाल यांनीही विचार मांडले.

मान्यवरांचे अभिप्राय !

१. अधिवक्ता प्रशांत पटेल, हिंदु डिफेंस लीग : साध्वी प्रज्ञासिंह यांना जो अत्याचार भोगावा लागला त्याला कोण उत्तरदायी आहे ?, आतंकवादी मदनी याला स्थानिक राज्य सरकार पंचतारांकित सुविधा देत आहे; मात्र साध्वींविषयी त्याच्या उलट होत आहे.

२. श्री. संदीप आहुजा, अध्यक्ष, अखंड भारत मोर्चा : हिंदूंनी पलायनवादी मनोवृत्तीचा त्याग करून संघर्ष करायला हवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *