Menu Close

धर्माभिमान्यांना धक्काबुक्की करणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार !

संस्कृत श्‍लोक आणि भगवा रंग असलेल्या पुस्तकांचे वितरण करून हिंदूंना फसवणारे धूर्त ख्रिस्ती !

candle-coptic-christianवाशी (नवी मुंबई) : येथील रेल्वेस्थानकावर भगव्या रंगातील येशूची पुस्तके वितरित करून धर्मप्रचार करण्याचा ख्रिस्त्यांचा कुटील डाव धर्माभिमानी हिंदूंनी हाणून पाडला. (कावेबाज ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा कुटील डाव हाणून पाडणारे धर्माभिमानी हेच हिंदु धर्माची शक्ती आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी अरेरावी करत धर्माभिमान्यांना धक्काबुक्की करणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे प्रविष्ट केले आहेत.

१. १० जूनला सायंकाळी वाशी रेल्वेस्थानकाबाहेर १० ते १५ ख्रिस्ती धर्मप्रचारक येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांना गटागटाने वेगवेगळ्या वेष्टनाची ख्रिस्ती धर्माची अनेक पुस्तके वाटत होते. यामध्ये सिडकोचे अधिकारी विजयकुमार आणि त्यांचे सहकारी होते.

२. तेथून जात असलेले धर्माभिमानी श्री. येतेश हेब्बाळकर आणि श्री. राजेश पवार यांनी याविषयी चौकशी केली असता ख्रिस्ती धर्मप्रचारक वाटत असलेल्या पुस्तकांमध्ये हिंदु धर्माची निंदानालस्ती करण्यात आली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

३. यांतील ‘तीर्थयात्रा’ नावाच्या भगव्या रंगाच्या पुस्तकात येशूच्या तोंडी संस्कृत श्‍लोक घुसडण्यात आले आहेत. (संस्कृत भाषा आणि हिंदु धर्माचे प्रतीक असलेल्या भगव्या रंगाचा वापर करून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे कावेबाज ख्रिस्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. ख्रिस्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्माभिमान्यांना ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी अरेवारी करत धक्काबुक्की केली. ‘तुम्ही पोलिसांकडे गेलात, तरी आमचे काहीही वाकडे होणार नाही’, अशी उर्मट उत्तरे दिली.

५. या वेळी सर्वश्री हेब्बाळकर आणि पवार यांनी अन्य धर्माभिमान्यांना बोलावून घेतले. धर्माभिमान्यांची वाढती संख्या पाहून ख्रिस्ती धर्मप्रचारक त्यांच्या ‘इनोव्हा’ गाडीतून पळूू लागले.

६. तेथे उपस्थित असलेले धर्माभिमानी सर्वश्री वसंत सणस, रमेश पावगे, शंतनू बर्गे आणि अन्य धर्माभिमान्यांनी त्यांना रोखले. या वेळी मात्र हिंदूंची वाढलेली संख्या पाहून ख्रिस्ती धर्मप्रचारक हात जोडून गयावया करू लागले. या वेळी प्रसंगावधान राखून हिंदु धर्माभिमान्यांनी ख्रिस्ती धर्मप्रचारकांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

७. या संदर्भात धर्माभिमान्यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता ख्रिस्ती धर्मप्रसारकांवर भा.दं.वि. ५०४, ३२३, ५०६ या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. थोड्या वेळाने काही अधिवक्ता येऊन त्यांनी ख्रिस्ती धर्मप्रचारकांची जामिनावर मुक्तता केली. (कावेबाज धर्मप्रसारक ख्रिस्त्यांना रोखण्यासाठी हिंदूसंघटनाशिवाय पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *