उडुपी (कर्नाटक) : येथील बसस्थानकाजवळ १२ जूनला सकाळी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद, तसेच इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
श्री. विजयकुमार यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला. या आंदोलनात उडुपी येथील हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. दिनेश नायक, पेलत्तुरू महालिंगेश्वर देवस्थानाचे मुख्याधिकारी श्री. रमेश पेलत्तुरू यांच्यासह अनेक धर्माभिमानी, तसेच ११ जिज्ञासू स्वयंप्रेरणेने आंदोलनात सहभागी झाले होते.
क्षणचित्रे
१. सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असूनही आंदोलनाला प्रारंभ होण्याच्या २० मिनिटे आधी पाऊस पूर्णपणे थांबला होता.
२. रस्त्यावरून जाणारे ८ पुरुष आणि ३ हितचिंतक महिला स्वयंप्रेरणेने आंदोलनात सहभागी झाल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात