बांगलादेशातील हिंदूंसाठी जगात कोणीच वाली नाही का ?
ढाका : व्हॉईस ऑफ जस्टीस या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता आहेत. जागतिक प्रसारमाध्यमांकडे त्याविषयी कुठलाही अहवाल उपलब्ध नाही. वर्ष १९७१ च्या बांगलादेश मुक्तीलढ्याच्या वेळी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला. त्या वेळी बांगलादेशमध्ये लाखो हिंदूंची हत्या करण्यात आली, तर अनेकांनी बांगलादेशमधून पलायन केले. आजही बांगलादेशमध्ये हिंदूंचा छळ चालूच आहे. एवढेच नव्हे, तर भारताविषयी सहानुभूती असल्याचा आरोप करत बांगलादेशमधील हिंदूंवर आक्रमणे करण्यात येत आहेत.
सदर वृत्तात पुढे म्हटले आहे की, बांगलादेशमध्ये धर्मस्वातंत्र्य नाही. बांगलादेशी हिंदू प्रतिदिन त्यांच्या देशातून भारतात पलायन करत आहेत. शेजारचा हिंदुबहुल भारत बांगलादेशी हिंदूंच्या व्यथेविषयी एक शब्दही बोलत नाही. (आपल्या धर्मबांधवांच्या यातनांकडे दुर्लक्ष करणार्या भारतीय हिंदूंना आणि बहुसंख्यांक हिंदूंच्या मतांवर निवडून येणार्या सत्ताधार्यांना हे लज्जास्पद नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात