Menu Close

बंगालमध्ये ६०० वर्षे प्राचीन केशवेश्‍वर मंदिरातील आरतीच्या भोंग्यावरून धर्मांधांनी हिंदूंची दुकाने जाळली !

धर्मांधांची वाढती आक्रमणे ही तृणमूल काँग्रेसला वारंवार निवडून देणार्‍या हिंदूंना मिळणारी ही शिक्षाच होय ! हिंदूंनो, ममता(बानो) बॅनर्जी यांच्या राज्यात असुरक्षित हिंदूंचे रक्षण केंद्रातील सरकारही करणार नाही, हे जाणा ! हिंदूंनो, या बातम्या वाचून झोपू नका, तर हिंदु राष्ट्रासाठी (सनातन धर्म राज्यासाठी) संघटित व्हा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

dharmandh1मंदिर बाजार (दक्षिण २४ परगणा, बंगाल) : येथील ६०० वर्षे प्राचीन केशवेश्‍वर मंदिरातील भोंग्यांवरून सकाळी आणि संध्याकाळी ऐकवल्या जाणार्‍या आरतीला रमजान असल्याचे सांगत धर्मांधांनी विरोध केला. त्यांनी मंदिरात घुसून भोंगे काढण्याचा प्रयत्न केला असता हिंदूंनी त्यांना संघटितपणे विरोध केल्याची घटना नुकतीच घडली.

१. रमझान महिन्याच्या ७ जून या पहिल्या दिवशी केशवेश्‍वर मंदिरात सायंकाळची आरती चालू असतांना धर्मांधांचा एक जमाव मंदिरासमोर जमला आणि त्यांनी आरती म्हणण्यास प्रतिबंध केला.

२. त्या आधी मंदिरातील आरती आणि नमाज यांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्यावर दोन्ही बाजूंचे एकमत होऊन हा प्रश्‍न शांतीच्या मार्गाने सोडवण्यात आला होता. यावर विचार करण्यासाठी १२ जून या दिवशी बाजार समितीचे पदाधिकारी, मंदिराचे सेवक, स्थानिक हिंदू आणि राजकीय पुढारी यांची बैठक चालू असतांना धर्मांधांनी बाजारातील दुकानांत जाळपोळ, लुटालूट करण्यास प्रारंभ केला.

२. काही धर्मांध केशवेश्‍वर मंदिरातही घुसले आणि त्यांनी मंदिरातील कर्णे काढून टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी धर्माभिमानी हिंदूंनी एकता दाखवून धर्मांध गुंडांचा प्रतिकार केला. अनेक गुंडांना चोपून काढण्यात आले. (धर्मांधांचा प्रतिकार करणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. धर्मांधांचा प्रतिकार करण्यासाठी शेजारील धनकाटा, लाक्ष्मीकांतपूर, सुखादेवापूर आदि गावांतूनही हिंदू गोळा झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून स्थिती नियंत्रणात आणली.

४. स्थानिक भाजप नेते नबेंदू हलदर यांनी संघ आणि विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते यांच्यासोबत मंदिर बाजार पोलीस ठाण्याला भेट देऊन हिंदूंना संरक्षण देण्याची विनंती केली.

५. पोलीस म्हणाले की, त्यांना देहलीतून आदेश आले आहेत की, रमझान मासात मुसलमानांना त्रास होता कामा नये. या आदेशांची प्रत दाखवण्यास मात्र त्यांनी असमर्थता दर्शवली. (रमझानच्या महिन्यात मुसलमानांना त्रास होऊ नये, यासाठी झटणारे पोलीस मुसलमानांकडून हिंदूंना होणार्‍या त्रासावर कधी कृती करणार ? रमझानच्या महिन्यात अन्य धर्मियांना त्रास कसा देता येतो ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *