Menu Close

बांगलादेशमध्ये इसिसच्या आतंकवाद्यांच्या आक्रमणात हिंदु प्राध्यापक गंभीर घायाळ !

८ सहस्र जिहाद्यांना अटक करूनही बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे चालूच !

ढाका : सहस्रो जिहाद्यांना अटक केल्यानंतरही बांगलादेशात इसिस समर्थक आतंकवाद्यांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबलेली नाहीत. येथील ५० वर्षीय प्राध्यापक रिपन चक्रवर्ती यांच्या घरात घुसून ३ आतंकवाद्यांनी त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. यात ते गंभीररित्या घायाळ झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.

पोलिसांनी सांगितले की, नजीमुद्दीन शासकीय विश्‍वविद्यालयात गणित शिकवणारे चक्रवर्ती यांच्या मदारीपूरस्थित घरामध्ये सायंकाळच्या वेळी हे आक्रमण झाले. आतंकवाद्यांनी चक्रवर्ती यांच्या घराचे दार ठोठावले. चक्रवर्ती यांनी दार उडल्यावर त्यांचे डोके, गळा आणि खांदे यांवर आक्रमण केले. चक्रवर्ती यांनी आरडाओराडा केल्यावर शेजार्‍यांनी यातील एकला पकडले, तर बाकीचे दोघे पळून गेले.

मदारीपूरचे पोलीस अधीक्षक सरवर हुसैन यांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या आक्रमणकर्त्याची चौकशी करण्यात येत आहे. आम्हाला शंका आहे की, तो एखाद्या आतंकवादी संघटनेचा सदस्य असू शकतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *