राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील मागणी
नागपूर : मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे या दिवशी न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघांची नावे वगळली आहेत. खोटे आरोप लादून तत्कालीन आतंकवादविरोधी पथक आणि राज्यकर्ते यांनी साध्वी अन् त्यांचे सहकारी यांचा अमानुष छळ केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या छळाला उत्तरदायी असणारे पोलीस अधिकारी आणि काँग्रेसचे तत्कालीन राज्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करावी. २०११ पासून हा खटला मुद्दाम प्रलंबित ठेवणार्या एन्आयएच्या अधिकार्यांवरही कठोर कारवाई करावी. हे सर्व खटले द्रुतगती न्यायालयात चालवून साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदू यांना न्याय द्यावा, या आणि अन्य मागण्यांसाठी १४ जून या दिवशी संविधान चौक, नागपूर या ठिकाणी दुपारी ४ ते ६ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
या वेळी सनातन संस्थेच्या सौ. मंगला पागनीस, रणरागिणी शाखेच्या सौ. नंदा खंडागळे, तसेच समितीचे श्री. श्रीकांत क्षीरसागर आणि श्री. अभिजीत पोलके यांनी प्रबोधन केले.
या वेळी बालभारतीच्या सहावी इयत्तेच्या पुस्तकात भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्या आणि अन्य गंभीर चुका करणार्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करा !, ही मागणीही करण्यात आली.
क्षणचित्र : पोलिसांनी पूर्ण वेळ थांबून विषय समजून घेतला. सनातन संस्थेविषयी ते म्हणाले, आम्हाला तुमचे आंदोलन अतिशय आवडले. विषयही पटला. केवळ आमच्या कर्तव्यामुळे आम्ही तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात