नाशिक : मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना मुद्दामहून अडकवून त्यांना छळणारे उत्तरदायी असणारे पोलीस अधिकारी आणि काँग्रेसचे तत्कालीन राज्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करावी. वर्ष २०११ पासून हा खटला मुद्दाम प्रलंबित ठेवणार्या एन्आयएच्या अधिकार्यांवरही कठोर कारवाई करावी. हे सर्व खटले द्रुतगती न्यायालयात चालवून साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदू यांना न्याय द्यावा, या आणि अन्य मागण्यांसाठी १४ जून २०१६ या दिवशी जिल्हाधिकर्यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी बालभारतीच्या सहावी इयत्तेच्या पुस्तकात भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्या आणि अन्य गंभीर चुका करणार्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात