Menu Close

काश्मीरप्रमाणे आता जम्मूतही धर्मांध सक्रीय : जम्मूमध्ये ३ दिवसांत ३ मंदिरांची विटंबना !

भाजप-पीडीपी सरकारच्या काळात हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

  • पुढे हिंदूंवर आक्रमण होऊन त्यांना काश्मिरातील हिंदूंप्रमाणे पलायन करावे लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

mandir-vidhvansजम्मू : नानकनगर येथील एका मंदिरात एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून तेथील सामानाची नासधूस केल्याची घटना लक्षात आली आहे. ३ दिवसांपूर्वी जम्मूतील रूपनगर येथील एका मंदिरात अशीच घटना घडली आहे. जम्मू पोलीस उपायुक्त सिमरदीपसिंह यांनी आरोपीला अटक केली असून त्याची ओळख पटली आहे, असे सांगितले.

ही घटना घडल्यावर हिंदू मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या घटनेच्या निषेधार्थ व्यापार्‍यांनी शहरातील दुकाने बंद केली. हिंदूंनी विविध ठिकाणी निषेध आंदोलने केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोचले आणि त्यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिल्यावर आंदोलकांनी आंदोलन थांबवले.

३ दिवसाआधी घडलेल्या घटनेने शहरात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. मात्र तेव्हा या संबंधात अटक झालेला आरोपी मनोरुग्ण होता, असे म्हणून पोलिसांनी घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र आता या दोन्ही घटनांचा परस्पराशी काही संबंध आहे का, हे पोलीस तपासून पहात आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *