विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : देशात निर्माण करण्यात आलेले कायदे अल्पसंख्यांकांना अधिकार देणारे आहेत. या कायद्यांमध्ये हिंदूंच्या संरक्षणासाठी काही नाही. त्यामुळे जोपर्यंत राज्यघटनेत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत हिंदूंना न्याय मिळणे कठीण आहे. त्यासाठी जनतेचे संघटन आवश्यक आहे. राज्यघटनेत परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य हिंदूंमध्ये निश्चित आहे. देश लुटला गेला, तरी चालेल, त्याचे विभाजन झाले तरी चालेल; पण राज्यकर्ते मताचे लांगूलचालन सोडण्यास सिद्ध नाही. अशा स्थितीत परिवर्तन होण्यासाठी केवळ शासनावर अवलंबून रहाणे योग्य नाही. शासन त्यांचे कार्य करेल, आपण आपले कार्य केले पाहिजे.
मानवतेचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक !
हिंदूंवर वेगवेगळ्या माध्यमांतून आघात होत आहेत. हिंदूंना कुठेही न्याय मिळत नाही. देशात अधिकतम शाळा ख्रिस्ती आहेत. तेथे वन्दे मातरम्, भारतमाता की जय, आदी म्हणण्यास प्रतिबंध आहे. हिंदूंना त्यांचा धर्म आणि संस्कृती वाचवायची असेल, स्वत:चे रक्षण करायचे असेल, या देशाला वाचवायचे असेल आणि अखिल मानवतेचे रक्षण करायचे असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. देशाला मानवतेच्या विरोधकांपासून मुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्र निर्माण करा.
सनातन संस्थेने पेटवलेली ज्वाला पुढे घेऊन जाऊ !
अलीकडे शनिशिंगणापूर, शबरीमाला आदी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी काही पुरोगामी महिलांकडून पूर्वापार चालू असलेल्या धर्मपरंपरा मोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जेव्हा जेव्हा धर्म बुडेल, तेव्हा हानी होईल. आपल्या मंदिरांमध्ये दान केलेले धन शासन कह्यात घेते. काही मंदिरांमध्ये आपलेच लोक पैशांचा अपहार करतात. त्यामुळे आपले मठ, आखाडे, तसेच मंदिरे यांचे संचालन करणारी राष्ट्रीय स्तरावरील हिंदूंची एक संस्था निर्माण केली पाहिजे. सनातन संस्थेने ज्वाला पेटवली आहे. ती विझू देणार नाही, ती पुढे घेऊन जाऊ आणि हिंदु राष्ट्र निर्माण करू, असा संकल्प करा. सर्व भेदभाव विसरून या संकल्पासाठी एकत्र या, हिंदु राष्ट्रासाठी लढण्याची सिद्धता ठेवा. हिंदु राष्ट्र निर्माण झाल्यास जगात शांतता नांदेल आणि जगाचे कल्याण होईल.