विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : अनेकदा दंगलींच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी दंगल केलेली असूनही हिंदूंना अन्याय्यपणे अटक केली जाते. अशा वेळी धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी पोलिसांना त्याची दूरध्वनीवरून किंवा आवश्यकतेनुसार पत्राने जाणीव करून दिल्यास पोलीस धर्मांधांवर कारवाई करतात, असा अनुभव आहे.
अधिवक्त्यांना न्यायालयीन प्रक्रिया ठाऊक असल्याने त्यांनी कारागृहात गेलेल्या कार्यकर्त्यांची मानसिकता सांभाळण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे. असे करत असतांना वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना संपर्क करून संभाव्य दंगल टाळण्यातही यश मिळू शकते. अशा पद्धतीने कार्य केले, तर एक धर्मप्रेमी अधिवक्ता एक सहस्रहून अधिक धर्मप्रेमींचे संघटनही सहजपणे करू शकतो. बेळगावमध्ये आज श्रीराम सेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धर्मप्रेमी अधिवक्त्यांविषयी त्यामुळेच विश्वासार्हता निर्माण झाली आहे.