विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : आज न्यायव्यवस्थेतील कच्च्या दुव्यांना हेरून अधिवक्ताच त्याचा दुरुपयोग करत आहेत. त्यासाठी लोकांना न्यायव्यवस्थेचा धर्मासाठी सुयोग्य उपयोग करण्याविषयी अवगत केले पाहिजे.
आज त्यासाठी केवळ इच्छाशक्ती असून उपयोगाचे नाही, तर त्या इच्छाशक्तीला म्हणजे निर्णयक्षमतेला क्रियाशक्तीची जोड हवी. ही क्रियाशीलता म्हणजेच कृतीशीलता होय. त्यासमवेतच तिला पुढे ज्ञानशक्तीची जोड मिळण्यासाठी हिंदूंना विधीसाक्षर अर्थात विधीप्रक्रियेची इत्थंभूत माहिती देणे आवश्यक आहे; म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेच्या भीतीने त्यांची होणारी फसवणूक आपल्याला टाळता येईल.