राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी जीवन समर्पित करण्याचा आदर्श निर्माण करणारे हिंदू विधीज्ञ परिषदेचे कर्नाटक समन्वयक अधिवक्ता अमृतेश एन्.पी. !
कर्नाटक येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता, तसेच हिंदू विधीज्ञ परिषदेचे कर्नाटक समन्वयक अधिवक्ता अमृतेश एन्.पी. हे त्यांच्या आईच्या मृत्यूनंतरचा ११ वा दिवस असूनही पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये सहभागी झाले आहेत. याविषयी ते म्हणाले, मी राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी जीवन समर्पित केले असल्याने आज येथे उपस्थित रहाणे, हे माझे कर्तव्यच आहे. प.पू. डॉक्टरांच्या प्रेरणेनेच मी येथे येऊ शकलो. (असे राष्ट्र आणि धर्म प्रेम किती हिंदूंमध्ये आहे ? असे असे राष्ट्र आणि धर्म प्रेमी अधिवक्ता हीच सनातन हिंदु धर्माची शक्ती ! – संपादक, हिंदुजागृती)
विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : मी आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे सत्याला चिकटून राहून जनताद्रोही राज्यकर्त्यांशी लढा दिला. त्यात गुरुकृपेनेच मला यश लाभले. त्यामध्ये मी न्यायालयीन प्रक्रियेतील विधीसंमत अधिकारांचा उपयोग केला. प्रसंगी मी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या विरोधातही अर्ज केले आणि तो लढा यशस्वी केला. त्यानंतर मी माहितीच्या अधिकाराखाली मुख्यमंत्र्यांनी दुरुपयोग केलेले जनतेचे ७० लक्ष रुपये पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करण्यास लावले.
गोवा राज्यशासन आणि केंद्रशासन यांनी श्रीराम सेनेचे श्री. प्रमोद मुतालिक यांना गोवा राज्यात प्रवेशबंदी केली आहे; मात्र आपण आज या अधिवेशनात निर्धार करूया की, पुढच्या अधिवेशनात श्री. मुतालिक उपस्थित रहाण्यासाठी आपण प्रयत्न करायचेच !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच आईच्या मृत्यूनंतरही मी खंबीर !
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने हिंदु राष्ट्र येणारच आहे. आज त्यांच्याच कृपेने मी माझ्या आईच्या देहांताला ११ दिवस झालेले असतांना तुम्हा सर्वांसमोर खंबीरपणे बोलू शकतो.