Menu Close

हिंदूंनी धर्म समजून घेणे, हाच हिंदूंच्या दुःस्थितीवरील खरा उपाय ! – अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी

kamleshchandra_tripathi
अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, अध्यक्ष तथा संस्थापक विश्‍वस्त, बुद्धीमत्ता समूह, उत्तरप्रदेश

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : भारत हा पूर्वी विश्‍वगुरु होता. आजही हिंदु धर्मामध्ये ती शक्ती आहे; मात्र आपणच आपले हिंदुत्व, धर्म यांना तिलांजली दिली आणि मागे पडलो. आज १४ टक्के असणारे अल्पसंख्य ८० टक्के हिंदूंवर कुरघोड्या करतात; कारण हिंदूंनी धर्म समजून घेतला नाही.

या देशात अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे संरक्षण होते; कारण ते संघटित आहेत. आज आपल्याकडे एखादा मुलगा गुंड बनला, तरी पालकांना त्याचे वैषम्य वाटत नाही; मात्र धर्मासाठी पूर्णवेळ कार्य करू लागला की, त्याचे वाईट वाटते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *