डॉ. उपेंद्र डहाके यांनी स्वतः साधनेच्या बळावर दिलेल्या धर्महितासाठीच्या लढ्याविषयी उपस्थितांना अवगत केले.
डॉ. डहाके म्हणाले की,
१. एका गोमांस वाहून नेणार्या ट्रकच्या संदर्भात मी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी ट्रक पकडूनही कारवाई करण्याचे टाळले.
२. मी धर्माभिमान्यांनाही सोबत घेतले होते; मात्र एका पोलीस निरीक्षकाने माझ्यावर दबाव आणून धर्मांधांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला.
३. मी नामजप करत होतो, त्यामुळे माझे आत्मबळ वाढल्याने मी त्यांना बधलो नाही. रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत मी निरनिराळे प्रयत्न करून अगदी स्थानिक लोकप्रतिनिधींना संपर्क साधूनही धर्मांधांवर कारवाई झाली नाही.
४. त्यानंतर मी या विरोधात न्यायालयात तक्रार दिली. स्थानिक न्यायाधीश महिलाही हे प्रकरण हाताळण्यास धजत नव्हत्या. अनेकदा पाठपुरावा केल्यावर त्यांनी सुनावणी केली.
५. त्यानंतर त्या पोलिसाच्या विरोधात जबाब नोंदवून घेतांनाही ३ वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मला दुपारपासून भोजन न करता ४ घंटे ताटकळत ठेवून सतावण्याचा प्रयत्न केला.
६. तरीही मी कृष्णाचा नामजप आणि प्रार्थना करत असल्याने त्यांच्याशी वैचारिक लढा दिला आणि त्यात यशस्वी झालो.
७. परिणामी महाराष्ट्रात जेव्हा गोवंश हत्याबंदी कायदा संमत झाला, त्याच दिवशी त्या पोलीस निरीक्षकावर कारवाई झाली.
८. धर्मकार्य करतांना साधना केल्याने अशा प्रकारे आपले कार्य पूर्णत्वास जाण्यास देवाचे साहाय्य मिळते, त्यामुळे धर्मकार्य करणार्यांनी साधना करणे अत्यावश्यक आहे.