विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : हिंदुत्ववादी संघटना, तसेच अनेक धर्माभिमानी वैयक्तिकपणे धर्मरक्षणासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करून कार्य करतात. अशा धर्माभिमान्यांना धर्मांध, तसेच पोलीस आणि प्रशासन यांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. अशा वेळी या धर्माभिमान्यांना साहाय्य करणे उद्योगपतींचे दायित्व आहे.
धर्मासाठी पुढे येणार्या धर्माभिमान्यांना पोलीस अटक करतात, तेव्हा त्यांना कायदेशीर साहाय्य केले पाहिजे. काही वेळा त्यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात येते. अशा वेळी घायाळ झालेल्या धर्माभिमान्यांचा वैद्यकीय व्यय करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबांना नैतिक आधार देणेही उद्योगपतींचे दायित्व आहे. ही दायित्वाची भावना लक्षात घेऊन धर्मसंस्थापनेच्या कार्यामध्ये विविध हिंदु धर्माभिमान्यांसह अनेक उद्योगपती पुढे आले आहेत, हे चांगले आहे.