विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : आज हिंदु महिलांनी राजमाता जिजाऊ, रणरागिणी राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नमा यांसारख्या वीरांगनांचा आदर्श ठेवण्यासाठी शारीरिक सिद्धतेसोबतच मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धताही केली पाहिजे. साधना करून आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम झालेल्या हिंदु महिलाच, ‘यह भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है ।’ या घोषणेला खर्या अर्थाने पूरक असे कार्य करू शकतात असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात केले.
कु. कोरगावकर म्हणाल्या,
१. आधुनिकतावादाच्या नावाखाली काही महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्यावर चढण्याचा दांभिकपणा केला असला, तरी शनिशिंगणापूर आणि परिसरातील एकही महिला त्यामध्ये नव्हती. त्यामुळे हा आधुनिकतावादी ढोंगी महिलांचा पराभवच आहे.
२. ज्या महिला कधीही रस्त्यावर उतरल्या नव्हत्या, त्यांनी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या गाभार्यात घुसणार्या नास्तिकतावादी महिलांना धडा शिकवला, हे महिलांतील धर्मजागृतीचे फलित आहे.
३. हिंदु महिलांचे धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण, तसेच अश्लीलता, लव्ह जिहाद यांना विरोध हे रणरागिणी शाखेच्या कार्याचे पैलू आहेत.