विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : देशातील एनडीटीव्ही, टाइम्स, सीएन्एन्-आयबीएन्, स्टार, हिंदुस्थान टाईम्स आदी माध्यमसमूह ही विदेशातील ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात माध्यमांमध्ये कितीही माहिती दिली, तरी त्यांना योग्य प्रसिद्धी दिली जात नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करत असतांना हिंदुद्रोही माध्यमांच्या विरोधात वैचारिक लढा देणे अपरिहार्य आहे. तो लढा प्रामाणिकपणे आणि धर्महिताच्या दृष्टीकोनातून दिल्यास आपण यशस्वी होऊ शकतो, असे अनुभवकथन लष्कर-ए-हिंदचे अध्यक्ष तथा हिंदुस्थान नॅशनल पार्टीचे अध्यक्ष श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले.
या वेळी श्री. खंडेलवाल यांनी सनातन संस्थेच्या विरोधात गेली ४ वर्षे चालू असणारा माध्यमांचा अपप्रचार, सनातनच्या साधकांवर केले जाणारे हत्या आणि स्फोट यांचे आरोप अन् वस्तूस्थिती यांची माहिती दिली. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीद्वारे उत्तर भारतातील दोन युवा साधिकांच्या निमित्ताने करण्यात आलेल्या अपप्रचाराला पत्रकार परिषदेद्वारे दिलेली चपराक, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे संमोहन करत असल्याचे दाखवून केलेला अपप्रचार आदींविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले.
श्री. खंडेलवाल यांचे सडेतोड विचार…
१. सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे कुणाचीही हत्या करूच शकत नाहीत; कारण ते हिंदू आहेत. हिंदु धर्मात इतरांना ठार करण्याची शिकवण दिली जात नाही.
२. सनातनच्या साधकांवर स्फोटांचे खोटे आरोप ठेवण्यात आले, त्यातून त्यांची मुक्तता झाली. आम्ही हिंदू आहोत, आम्ही कधीही मातृभूमीमध्ये स्फोट करणार नाही.
३. आज विश्वातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात प्रसारमाध्यमांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, ही एक मोठी त्रुटी आहे.
४. ५४७ खासदार ९० कोटी हिंदूंचे भले करू शकत नाहीत; मात्र ९० कोटी हिंदू हिंदु राष्ट्राची स्थापना करून विश्वकल्याण नक्की साधू शकतात.
अतिरेक्याचे उदात्तीकरक करणार्या न्यायाधिशाच्या विरोधात लोकशाहीमार्गाने दिलेला लढा !
मागे प्रसारमाध्यमे अबू सालेम या अतिरेक्याचे उदात्तीकरण करत होती; मात्र त्या विरोधात काही हस्तफलक घेऊन आम्ही २५ कार्यकर्त्यांनी न्यायालयासमोर निदर्शने केली. न्यायाधिशांनी आमच्यावर कारवाई केली; मात्र मी त्यांना अतिरेक्याच्या सुव्यवस्थेची चौकशी न्यायाधिशांनी करणे अयोग्य आहे, असे निक्षून सांगितले. त्यानंतर मी त्या न्यायाधिशांच्या पक्षपातीपणाविषयी विधी आणि न्याय विभागाकडे तक्रार केल्यावर त्यांना पदावरून हटवण्यात आले; म्हणजे आपण लोकशाही मार्गाने आपले कार्य यशस्वी करू शकतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील संमोहनाविषयीच्या आरोपाची खंडेलवाल यांच्याकडून चीरफाड !
श्री. खंडेलवाल म्हणाले, जर आमचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे खर्या अर्थाने इतरांकडून संमोहनाद्वारे कार्य करून घेण्याची शक्ती असती, तर आम्ही संसदेतील ५४७ खासदारांना संमोहित करून हिंदु राष्ट्र कधीच स्थापन केले असते. आम्हाला हिंदु राष्ट्रासाठी एवढे कष्ट घ्यावे लागले नसते; मात्र तसे झालेले नाही. याचा अर्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील संमोहनाचे (मास हिप्नॉटिझम्चे) आरोप धादांत असत्य आहेत.