विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : हिंदूंची देवळे, त्यांच्यावरील धर्मांधांचे छुपे आक्रमण, देवळांची दुरवस्था आदींच्या संदर्भातील प्रश्नांची हिंदूंना चांगली जाण असते; मात्र त्या संदर्भात योग्य कृती करतांना त्यांच्याकडून गल्लत होते. मलाही आपल्या देवळांच्या संदर्भात काही समस्या दिसल्या. तेव्हा मी त्या समस्येचा पूर्ण अभ्यास केला. त्या संदर्भात आवश्यक तेथे माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली. त्यानंतर त्या समस्येच्या संदर्भात सहजसोपे वर्णन करणारे पत्र वृत्तपत्रांना दिले आणि तेच पत्र कात्रणांसह मुख्यमंत्री अन् शासकीय अधिकारी यांना पाठवले. त्यामुळे हिंदूंच्या अनेक समस्यांवर मुख्यमंत्र्यांनीही योग्य ती कार्यवाही केली; म्हणजे अभ्यासपूर्ण आणि प्रभावी पत्रलेखनाद्वारे हिंदु धर्मासाठी मोठे योगदान देता येऊ शकते, असा विश्वास रंगा रेड्डी (तेलंगणा) येथील श्री. के.व्ही. रमणमूर्ती यांनी व्यक्त केला. भाषणाच्या शेवटी श्री. रमणमूर्ती यांनी हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच !, असे निक्षून सांगितले.
श्री. रमणमूर्ती म्हणाले की,
१. एका देवळासमोरून होणार्या वाळूच्या ट्रकच्या वाहतुकीमुळे वाळू रस्त्यावर पडून अनेकांची वाहने घसरत होती. त्याविषयी पत्रलेखन केल्यानंतर काही वाळूमाफियांनी शासकीय अधिकार्यांवर दबाव आणला; मात्र मी त्याविषयी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले होते. परिणामी त्या वाळूमाफियांना न जुमानता शासनाला वाळूवाहतूक बंद करावी लागली.
२. एका देवळाच्या भिंतीवर धर्मांधांनी अतिक्रमण केले होते. मी त्याची माहिती छायाचित्रांसह वृत्तपत्रांत दिल्याने शासकीय अधिकार्यांना ते अतिक्रमण हटवावे लागले.
३. एका देवळातील दानपेटीत जमा होणार्या विदेशी रकमेची मोजणीच केली जात नव्हती. तेव्हा दीड कोटी रुपये जमा व्हायचे. मी विदेशी रकमेविषयी वृत्तपत्रांतून पत्राद्वारे जागृती केली. त्याविषयीही मुख्यमंत्र्यांना नोंद घ्यावी लागली. परिणामी आता दानपेटीतून जमा होणारी रक्कम अडीच कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.
४. तिरुपति येथेही उभारण्यात येणार्या इस्लामिक विद्यापिठाविषयी अशीच माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवली. हिंदु जनजागृती समितीने आंदोलनासाठी सहकार्य केले आणि आज तेथील बांधकामाला स्थगिती मिळवण्यात यश आले आहे.