विद्याधिराज सभागृह, रामनाथी (वार्ता.) : सनातन हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ आहे. विश्वाला गणित देणारे श्रीनिवासन् रामानुजाचार्य, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारे भास्कराचार्य भारतीय संस्कृतीनेच दिले. त्यामुळेच अमेरिकेतील विद्यापिठांत गीता शिकवली जाते. फ्रेंच शास्त्रज्ञ अॅन्टोनी डेव्हिस हा ॐकारातून येणार्या मोठ्या ऊर्जेमुळे चकित होतो.
आज पाश्चात्त्यांच्या विकृतींमागे हिंदू धावत आहेत; मात्र त्यांना त्यासाठी भारतीय संस्कृतीची महती समजलेली नाही. त्यासाठीच संत श्री आसारामजीबापू यांनी १४ फेबु्रवारीला मातृ-पितृ दिवस घोषित केला. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत तुलसीपूजन, गोरक्षण इत्यादींचे आयोजन करण्याची कल्पना मांडली. हिंदु पद्धतीनुसार सण साजरे करणे, आदिवासी भागातील हिंदूंना आधार देणे, व्यसनमुक्ती आदींचे प्रयोजन केले आहे. हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ आहे; मात्र त्याचे आचरण केले नाही, तर हिंदु धर्म होता, असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठीच हिंदु धर्माचे आचरण करणे, हे अत्यावश्यक आहे, असे मार्गदर्शन संत श्री आसारामजीबापू यांच्या शिष्या पू. साध्वी रेखाबहनजी यांनी केले. पू. रेखाबहनजी यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी संत श्री आसारामजीबापू यांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याच्या लहान-लहान ध्वनीचित्रचकत्या दाखवल्याने विषय परिणामकारक झाला.