Menu Close

पाकमध्ये ॐ हे चिन्ह छापलेल्या चपलांची विक्री, हिंदूंचा तीव्र विरोध !

  • पाकमधील धर्मांधांचा हिंदुद्वेष !

  • हिंदूंनो, पाकला ॐचे विडंबन रोखायला लावण्यासाठी केंद्रशासनाला भाग पाडा !

om_tag_shoo_pak

नवी देहली : पाकमधील तांडो आदम शहरात असणार्‍या फरमान अहमद की जेब या दुकानात ॐ हे चिन्ह असलेल्या चपलांची सर्रास विक्री केली जात आहे. यास पाकच्या सिंध प्रांतातील हिंदूंनी विरोध दर्शवला आहे. पाकमधील हिंदु नेते डॉ. रमेश कुमार वंकावानी म्हणाले, तांडो आदम शहरात गेल्या ३ वर्षांपासून ईदच्या काळात हिंदूंसाठी पवित्र असलेले चिन्ह छापलेल्या वस्तूंची विक्री केली जात असून त्यामागे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, हा एकमेव उद्देश आहे.

आम्ही याविरोधात ऑनलाईन मोहीम राबवून अशा चपलांची विक्री त्वरित थांबावी, अशी मागणी करत आहोत. शासनाने अशा चपलांची विक्री न थांबवल्यास प्रसंगी हिंदु तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतील.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *