विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेत वसंतपंचमीला श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यास मज्जाव केला जातो. धर्मांधांना तेथे नमाजपठण करू दिले जाते. नेहमी हिंदूंवर लाठीमार केला जातो. या वर्षी मात्र आम्ही नियोजनबद्धरित्या वसंतपंचमीला हिंदूंवर लाठीमार होऊ नये, यासाठी २५ जानेवारीपासून आंदोलनाला प्रारंभ केला. त्यामुळे जनजागृती झाली आणि हिंदूंवर लाठीमार झाला नाही. तेथे जगद्गुरु शंकराचार्य श्री नरेंद्रानंद सरस्वती आले; मात्र त्यांना काही राजकीय पक्षांच्या हिंदु संघटनांनीच विरोध केला. ते पाहून आम्ही चक्रावून गेलो; मात्र आम्ही निर्धार केला होता. आम्ही माध्यमांसमोर गेलो, तेव्हा स्थानिक पोलिसांवर दबाव आला आणि त्यांनी मुसलमानांना त्यांच्या १ च्या वेळेपूर्वी १२ वाजताच नमाजपठण करून त्यांचे चित्रीकरण करून घेतले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता हिंदूंना आत सोडले. तेथे हिंदूंनी विधीवत् पूजा केली. शासनाला मुसलमानांकडून वेळेआधी नमाजपठण करून घ्यावे लागल्याने या लढ्यात नैतिकदृष्ट्या हिंदूंचाच विजय झाला. या प्रसंगामुळे हिंदुत्वाच्या गप्पा मारणार्या राजकीय पक्षाच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले; म्हणूनच हिंदूंची फसवणूक करणार्या राजकीय पक्षांना भुलू नका, असे आवाहन धार येथील आंदोलन आणि हिंदू महासभा यांचे नेते श्री. जीतेंद्र ठाकूर यांनी केले.
श्री. ठाकूर पुढे म्हणाले की, त्यानंतर आम्ही उज्जैनच्या कुंभमेळ्यात संतांचे संमेलन घेतले. या वेळी सर्व संत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत होऊ इच्छित असल्याचे आम्हाला लक्षात आले. त्यामुळे हिंदूंनी कोणत्याही राजकीय पक्षावर विसंबून न रहाता, सांप्रदायिक ऐक्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता ठेवावी.