पुणे : हिंदु स्त्रिया धर्माचरण करत नसल्याने धर्म धोक्यात आला आहे. वर्ष १९४७ मध्ये इंग्रज भारत सोडून जातांना त्यांनी काळे इंग्रज अर्थात भारतियांना इंग्रजाळलेले करून गेले. आजच्या स्त्रिया स्वत:च धर्माचे पालन करत नसल्यानेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या १ लक्ष ७५ सहस्र मुली या लव्ह जिहादला बळी पडल्या. हिंदूंची जननशक्तीच नष्ट करण्याचे हे षड्यंत्र आहे. सध्या धर्माचे तत्त्वज्ञान आईलाच शिकवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.
शिवराज्याभिषेकदिन आणि हिंदु साम्राज्यदिनाच्या निमित्ताने १८ जून या दिवशी येथील मंगळवार पेठेतील धर्माभिमानी तरुणांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी स्वरूपवर्धिनी संस्थेच्या मुलांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक उपस्थितांसमोर सादर केले.
क्षणचित्र – कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनात उपलब्ध असलेला लव्ह जिहादची माहिती सांगणारा ग्रंथ अनेकांनी खरेदी केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात