Menu Close

गोहत्या हेे हिंदूंना नष्ट करण्याचे एक षड्यंत्र ! – अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा, राज्य अध्यक्ष, बिश्‍वो गो सुरख्या वाहिनी, कटक, ओडिशा

suresh_panda
अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा

विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : आईनंतर गोमातेच्या दुधापासून मनुष्याचे पोषण होते. गोमातेमुळे येथील हिंदु धष्टपुष्ट होतात. गोमाता नष्ट केल्याने भारतातील हिंदूही आपोआपच नष्ट होणार आहेत. त्यामुळे गोहत्या हेे हिंदूंना नष्ट करण्याचे एक षड्यंत्र आहे. गोहत्येबरोबरच हिंदु राष्ट्राची चळवळ खंडीत होणार आहे, असाही हिंदुविरोधकांचा विचार आहे. असे प्रतिपादन ओडिशा येथील अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा यांनी येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात केले.

कोणतीही संघटना, पक्ष किंवा संस्था यांतील लोकांनी गोमातेसाठी कार्य केले, तर त्यांचे जीवनाचे सार्थक होणार आहे, अन्यथा त्यांचे जीवन व्यर्थ जाईल. गोमातेच्या रक्षणामुळे केवळ भारतच नाही, तर सर्व मानवजातीचे कल्याण होणार आहे. जे माझ्या गोमातेची हत्या करत आहेत, त्यांचा प्रतिकार करण्यासाठी मला आशीर्वाद हवा आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *