विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी च्या सत्रात भारत रक्षा मंचचे श्री. मुरली मनोहर शर्मा उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, १८ व्या शतकांपूर्वी भारतात गोहत्या होत नव्हती. सर्वाधिक क्रूरकर्मा औरंगजेबाच्या काळातही गोहत्या झाली नाही; मात्र स्वतंत्र भारतात उघडपणे गोहत्या होत आहेत. ओडिशातूनही बांगलादेशात मोठ्या प्रमाणात गोतस्करी होत आहे. हे थांबवण्याचे कार्य भारत रक्षा मंच करत आहे. ज्याप्रमाणे देशात मुसलमानांच्या लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे, तसा देशातून हळूहळू गोवंश लुप्त होत आहे. गोमांसाचे मुख्य व्यापारी मुसलमान आहेत; मात्र गायीची विक्री करणारे, त्यांना वाहनात भरून विक्रीकरता घेऊन जाणारे हिंदूच आहेत.
श्री. शर्मा म्हणाले, आता आम्ही हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न केले नाही, तर पुढे कधीच प्रयत्न करू शकणार नाही. आता जागे होण्याची वेळ आली आहे. आपल्याला जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्न केल्यास हिंदु राष्ट्र आल्याशिवाय रहाणार नाही. आतापर्यंत मुसलमान हिंदूंवर अत्याचार करत आले; मात्र आता हिंदूंनी प्रतिकार करण्याची वेळ आली आहे. आम्ही हरिचे दास आहोत. हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वर करणारच आहोत. ईश्वर आमच्याकडून हे कार्य करून घेणारच आहे.