विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदूंची संख्या अल्प होत आहे. तेथे हिंदु धर्मानुसार विविध निसर्गदेवतांचे पूजन करणार्या ४० जमातींचे १४ लक्ष लोक आहेत. तेथे एखादा ख्रिस्ती अधिकारी आला की, तो ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या योजना राबवतो आणि या जमातींचे फसवून धर्मांतर केले जाते. त्यामुळे तेथे मागास असणार्या जमातींचे धर्मांतर रोखण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आज देशभरातील हिंदूंचा पाठिंबा आवश्यक आहे. समस्त हिंदूंनी एक समजून घ्यावे की, या जमाती या सनातन हिंदु धर्माच्या अविभाज्य घटक असून त्यांनाही सनातन हिंदु धर्माची तितकीच ओढ आहे, असे प्रतिपादन अरुणाचल प्रदेशच्या पपूम परे येथून आलेले नेते श्री. कुरु ताई यांनी केले.
या वेळी सूत्रसंचालक श्री. अभिजीत देशमुख यांनी सर्व उपस्थितांना विचारले, “‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चे श्री. कुरु ताई यांना काय उत्तर आहे ?” तेव्हा सर्वांनी एकजुटीने हात उंचावून श्री. कुरु ताई यांना आश्वासन दिले की, “अरुणाचलमधील हिंदूंच्या पाठीशी या अधिवेशनातील समस्त हिंदू असून अरुणाचल प्रदेशच्या हिंदूंनी कधीही हाक दिल्यास आम्ही नेहमीच त्यांना सहकार्य करू !”