विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी आमचा संपर्क आहे. समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांच्याकडून प्रत्येक कार्याविषयी आम्ही सल्ला घेतो. त्यामुळेच आम्ही योग्य पद्धतीने हिंदु धर्माचे कार्य करत आहोत. माझे सर्व हिंदुत्ववाद्यांना आवाहन आहे की, आपण सर्वांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या हिंदु राष्ट्रविषयक ग्रंथांचा अभ्यास करा ! त्यानुसार जर आपण कार्य केले, तर आपल्याला यश निश्चित मिळते, असा आमचा अनुभव आहे, असे ठाम प्रतिपादन जबलपूर (मध्यप्रदेश) येथील हिंदू सेवा परिषदेचे सचिव श्री. निखिल कनोजिया यांनी केले. ते अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील २१ जूनच्या सायंकाळच्या सत्रात बोलत होते.
श्री. कनोजिया म्हणाले की,
१. लव्ह जिहादच्या विरोधात हिंदूंनी प्रबोधन, संघटन आदी सर्व माध्यमांतून कार्य केले पाहिजे.
२. जबलपूर येथे एका शिकवणी घेणार्या धर्मांधाने हिंदु युवतीला लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवले; मात्र आम्ही त्याच्या विरोधात प्रयत्न केले. त्या तरुणीचे प्रबोधन करण्यात येत असून आता त्या धर्मांधाला त्याचा शिकवणी वर्ग बंद करावा लागला आहे.
३. जेथे धर्मांध लॅण्ड (भूमी) जिहाद करतात, तेथे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना भूमी घेणे, भाड्याने घर घेऊन रहाणे अशा विविध मार्गांनी प्रयत्न करण्यास सांगतो.
४. मशिदींमधून अनधिकृतपणे दिली जाणारी बांग थांबावी, यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, त्यामुळे उच्च न्यायालयाने काही मशिदींना नोटीस बजावली आहे.