Menu Close

तमिळनाडूत हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदु मक्कल कच्छीला संतांनी आशीर्वाद द्यावा ! – अर्जुन संपथ, हिंदु मक्कल कच्छी

arjun_sampat
अर्जुन संपथ, हिंदु मक्कल कच्छी, तमिळनाडू

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : तमिळनाडू राज्यातील हिंदूंची हिंदु धर्माशी असलेली नाळ तुटावी, यासाठी तेथे द्रविड हे मूळनिवासी असल्याचा कांगावा करण्याचे षड्यंत्र वर्ष १९६७ पासून चालू आहे. द्रविडांना हिंदूंपासून तोडणे, जाती-जातींमध्ये फूट पाडणे, असे राजकारण करणार्‍या लोकप्रतिनिधींनी तमिळनाडूतील हिंदुत्व संपवण्याचा प्रयत्न चालवला आहे. असे असले, तरी आम्ही मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. हिंदु मक्कल कच्छी ही संघटना तमिळनाडूत हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना स्वस्थ बसणार नाही. सनातन संस्थेचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि येथे उपस्थित असलेल्या संतांनी आम्हाला आशीर्वाद देऊन आमच्या मागे आध्यात्मिक पाठबळ उभे करावे, अशी प्रार्थना तमिळनाडूतील हिंदु मक्कल कच्छी (हिंदू जनता पक्ष) संघटनेचे अध्यक्ष आणि श्रीलंकेतील हिंदूंच्या रक्षणासाठी देश-विदेशात प्रयत्न करणारे श्री. अर्जुन संपथ यांनी केली. ते पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २१ जूनला सायंकाळच्या सत्रात बोलत होते.

श्री. अर्जुन संपथ म्हणाले की,

१. आज तमिळनाडूमध्ये जयललिता, करुणानिधी यांच्यासारखे जे जनतेचे नेते म्हणवणारे आहेत, त्यांनी केवळ जाती-जातींचे राजकारण केले आहे.

२. ब्राह्मणद्वेेष हे त्यांचे मुख्य शस्त्र असून अन्य हिंदूंना तुम्ही आर्य नसून मूळनिवासी आहात, असे सांगून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न तेथे केला जातो.

३. चित्रपटक्षेत्राचे अवास्तव महत्त्व निर्माण करून समाजकारणाला, राष्ट्रकारणाला तिलांजली दिली आहे.

४. आजच्या जयललिता यांच्या शासनातही बॉम्बस्फोटांच्या समर्थकांचा समावेश आहे.

५. येथील हिंदूंच्या देवळांवरसुद्धा ख्रिस्ती आणि मुसलमान यांचे विश्‍वस्त नेमण्यात येत आहेत.

६. अनेक न्यायाधिशांनाही ख्रिस्ती, मुसलमान आणि निरीश्‍वरवादी यांनी विकत घेतले आहे. त्यामुळे हिंदूंना न्याय मिळणे अवघड झाले आहे.

७. हिंदुत्वाचे काम करणार्‍यांना उघडपणे धमक्या दिल्या जातात. हिंदूंच्या हत्या होतात; मात्र त्याचे राज्यकर्त्यांना काहीही पडलेले नसते.

८. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र ही तमिळनाडूतील हिंदूंची निकराची आवश्यकता आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *