रामनाथी (गोवा) : येथील आयोजित पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात अापला अनुभव उपस्थितांना सांगताना कर्नाटकचे उद्योगपती श्री. अनंंत कामत म्हणाले, माझेही जीवन सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे होते. सनातन संस्थेशी संपर्क आल्यावर प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला जीवनाचा अर्थ समजला. साधनेला प्रारंभ केला. त्याचबरोबर व्यवसायासह मी एक गोशाळाही चालू केली.
माझ्या वडिलांना कर्करोग असल्याचे समजले. आधुनिक वैद्यांनी ते अधिकतर ६ मास जगतील, असे सांगितले होते. त्यांना रुग्णालयातून घरी आणले. वडील संपूर्ण शाकाहारी होते, तसेच त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. एवढेच नव्हे, तर ते प्रतिदिन १ घंटा व्यायामही करत होते. असे असतांना त्यांना कर्करोग कसा झाला ? याचा मी विविध माध्यमांतून शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्यवसायानिमित्त माझी एका व्यक्तीशी ओळख झाली. त्यांच्याकडून समजले की, विदेशी (जर्सी) गायींमुळे उच्च रक्तदाब, डायबेटिस, कर्करोग यांसह अनेक रोग होतात. त्यानंतर त्यांनी माझ्या गोशाळेत ४० गायींपैकी ९ गायी संकरित असल्याचे सांगितल्याप्रमाणे मी त्या ९ गायी दुसर्या गोशाळेत पाठवून दिल्या. व्यवसायिक मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार देशी गायीचे प्रतिदिन दूध आणि सकाळी गोमूत्र वडिलांना देण्यास चालू केले. त्यानंतर १४ मासानंतर वडिलांची आरोग्य तपासणी केल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे लक्षात आले. त्यांचा पी.एस्.आय. २८२ वरून ०.९ वर आला होता. प्रारंभी हे आधुनिक वैद्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी वडिलांचा अहवाल पुन्हा १ मासानंतर दाखवण्यास सांगितले. त्यानंतरही त्यांचा अहवाल सकारात्मक असल्याचे आढळून आले. याचे आधुनिक वैद्यांनाही आश्चर्य वाटले. केवळ गोमाता आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) यांच्या आशीर्वादानेच हे घडू शकले.
आता आमच्याकडे ६७ गायी आहेत. गायींपासून मिळणार्या दुधापासूनच नाही, तर शेण आणि गोमूत्र यांपासूनही आर्थिक लाभ मिळू शकतो. आज गोपालनापासून लांब गेल्यामुळे देशाच्या २० लाख कोटी रुपयांची हानी होत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात गोमातेचे पालन करून लाभ करून घेतला पाहिजे.