विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : पूज्यपाद संतश्री आसारामजी आश्रम च्या धर्मप्रचारक साध्वी तरुणा बहेन अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील हिंदुत्ववाद्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि, संतांची मांदियाळी हे भारताचे वैशिष्ट्य आणि गौरवाचे स्थान आहे; मात्र आज जीवनाच्या उन्नतीचा मार्ग दाखवणार्या संतांवर हिंदूंकडूनच खोटे आरोप केले जात आहेत. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर खोटे आरोप होऊन ३ वर्षे झाली. आतापर्यंत त्यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नाही, तरीही त्यांना कोणतीही सवलत दिली गेली नाही. निरपराध माणसांची हत्या करणार्या सलमान खानच्या खटल्याची जलद सुनावणी होते; मात्र संतांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबून ठेवले जाते, हे दुर्दैवी आहे. चित्रपटांमधनूही हिंदू संतांना दोषी ठरवले जाते. संत आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी आपण सिद्ध झाले पाहिजे. महाभारतकाळात एकच धृतराष्ट्र होता; मात्र आजच्या समाजात अनेक धृतराष्ट्र असून समाज आंधळा होत चालला आहे. न्याययंत्रणेत अनेक त्रुटी असल्यामुळे आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा नाही; म्हणूनच संत आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.
साध्वी तरुणा बहेन यांचे क्षात्रतेजयुक्त आवाहन….
१. जर कुराण वाचून मुसलमान अत्याचार करू शकतात, तर भगवद्गीता वाचून आपण अन्यायाचा प्रतिकार का करू शकत नाही ?
२. आता आम्ही जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् असा जयघोष केवळ शाब्दिकदृष्ट्या करणार नाही, तर तो प्रत्यक्ष आचरणातही आणून दाखवू.
३. जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् हा संपूर्ण भारताचा नारा बनायला हवा.