विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : सनातन हिंदु धर्माची पहिली आचारसंहिता स्वयं ब्रह्मदेवाने बनवली होती. त्यानंतर इंद्र, प्रजापति, मनु आदींनीही धर्मनियम बनवले. ते नियम हे शाश्वत आणि त्रिकालाबाधित आहेत; मात्र भारतीय राज्यघटनेत आजवर १०० सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या अशाश्वत राज्यघटनेचा अपलाभ उठवत हिंदूंवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. असे ठाम प्रतिपादन बंगाल येथील शास्त्र-धर्म प्रचार सभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी केले. ते अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील २२ जूनच्या सत्रात बोलत होते.
डॉ. सेन पुढे म्हणाले, हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी धर्माधारित राज्यघटनाच आवश्यक आहे. आज आक्रमकांना अल्पसंख्यांक दर्जा दिला गेला असून त्यामुळे बहुसंख्यांकांवर अन्याय होत आहे. आजवरची भारताची अर्थव्यवस्था, रहाणीमान आदी केवळ अहिंदूंच्या आक्रमणामुळे खालावले आहे. ते सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे.
श्री. सेन यांनी सांगितलेली अनुभूती
श्री. सेन म्हणाले की, वर्षभरापूर्वी माझी एक शस्त्रक्रिया करायची होती; मात्र आधुनिक वैद्यांच्या अनुपलब्धतेमुळे ती ६ मास पुढे ढकलली गेली. त्यानंतर मी एका संतांच्या सांगण्यानुसार ती केली. तेव्हा शस्त्रक्रिया झालेल्या भागातच कर्करोगाची गाठ सापडली. ती काढली; म्हणजे माझे आजचे आयुष्य हे संतांच्या कृपेने वाढलेले बोनस आयुष्य आहे.