Menu Close

आधुनिकतावाद्यांचा हिंदूविरोधी प्रचार रोखण्यासाठी परिणामकारक जागृती आवश्यक ! – अधिवक्ता देवदास शिंदे, पुणे

Devdas_Shinde
अधिवक्ता देवदास शिंदे, सचिव, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान, पुणे

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : हिंदु राष्ट्राची संकल्पना हिंदूंना समजावत असतांना आधुनिकतेच्या नावाखाली पुरोगामी, बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांसारख्या विविध राज्यांत विविध नावांनी कार्यरत असणार्‍या संघटना अडथळे निर्माण करतात. हिंदूंच्या रामनवमीच्या वेळी ते वानरसेना लिहिणे-वाचणे कोणत्या शाळेत शिकली ? असा एक संदेश पाठवून हिंदु विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात. त्यामुळे त्यांचा विखारी प्रचार रोखण्यासाठी आपल्याला धर्मशिक्षण, राष्ट्रप्रेम शिकवणारे ग्रंथ, सनातन प्रभात आदींच्या माध्यमातून जनजागृती करणे अत्यावश्यक आहे, असे मार्गदर्शन पुणे येथील अधिवक्ता श्री. देवदास शिंदे यांनी केले.

अधिवक्ता श्री. शिंदे म्हणाले की,

१. मेकॉलेकृत शिक्षणपद्धतीमुळे आज एमपीएससी अन् युपीएससी यांद्वारे संस्थानिक निर्माण करण्यात येत आहे.

२. त्या शिक्षणात क्रांतीकारक भगतसिंग यांना अतिरेकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध अपशब्द वापरले जातात.

३. मूलनिवासींच्या चळवळीच्या माध्यमातून बामसेफसारख्या संघटना देशभरात विविध नावांनी कार्यरत असून ती हिंदूंमध्ये फूट पाडत आहे.

४. कन्हैयाकुमार यांच्यासारख्या अपप्रवृत्तींना अकारण मोठे केले जाते.

५. हिंदूंनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात जावे.

६. हकिकत राय यांच्यासारख्या राष्ट्रप्रेमींच्या ग्रंथांचे वाचन करावे.

७. आत्मबळ वाढवण्यासाठी साधनाही केली पाहिजे.

या सत्रात काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या अपप्रवृत्तींमुळे होत असलेली हिंदुत्वाची हानी आणि ती रोखण्याची आवश्यकता या विषयावर सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी, तर हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा या विषयासंदर्भात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *