विद्याधिराज सभागृह, रामनाथी : पुढील सहस्रो वर्षे अखिल मानवजातीला मार्गदर्शक असलेले हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी ईश्वरी नियोजनानुसार उच्चलोकातून बालकांनी जन्म घेतला आहे. अशा बालकांमध्ये उपजतच राष्ट्र आणि धर्म यांप्रती प्रेम, ईश्वराप्रती अनन्यभाव, तसेच साधना करण्याची तीव्र तळमळ असे गुण आहेत. सनातनला आजपर्यंत अशा ५०० बालकांची ओळख झाली असून यापैकी ६ दैवी बालकांची ओळख येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय अधिवेशनात उपस्थित धर्माभिमान्यांना करून देण्यात आली. हे बालक रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करत असून काही जण आश्रमात राहून शालेय शिक्षण घेत आहेत.
सेवाभाव, त्याग आणि तत्त्वनिष्ठता आदी गुण असलेले सनातनच्या रामनाथी आश्रमातील दैवी बालक !
या वेळी रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणार्या, तसेच आश्रमात राहून शालेय शिक्षण घेणार्या ६ दैवी बालकांची ओळख करून देण्यात आली. कु. राधा शेळके, कु, वैभवी झरकर, कु. अंबिका हंबर्डे, कु. अमृता मुद्गल, कु. जयेश कापशीकर, कु. कन्हैया श्रीवास्तव या बालसाधकांनी सेवाभाव, त्याग आणि तत्त्वनिष्ठता आदी गुणांमुळे लहान वयातच साधनेत प्रगती केली आहे. या वेळी अन्य दैवी बालकांविषयी माहिती देणारी ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.
तंजावूर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊस्वामी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात केलेल्या उच्छिष्ट गणपती यागाची उपस्थितांना अनुभूती !
सनातनच्या रामनाथी आश्रमात १४ ते १७ जानेवारी २०१५ या कालावधीत संपन्न झालेल्या उच्छिष्ट गणपती यागा ची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झालेल्या या यागात तंजावर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञीय ज्वालांमध्ये अग्नीप्रवेश केल्यानंतरही साधनेमुळे अग्नी स्पर्श करत नाही, याची प्रत्यक्ष अनुभूती ध्वनीचित्र-चकतीच्या माध्यमातून उपस्थित धर्माभिमान्यांनी घेतली.