Menu Close

धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक ! – श्री. अतुल जेसवानी, संस्थापक अध्यक्ष, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश

श्री. अतुल जेसवानी, संस्थापक अध्यक्ष, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : मुसलमान लव्ह जिहाद आणि ख्रिस्ती सेवेच्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. हिंदु मुलगी मुसलमान युवकासह पळून जाते आणि त्याच्याशी विवाह करून मुसलमान होते, हेही धर्मांतरच आहे. त्यानंतर त्यांची पिळवणूक झाल्यावर खरे वास्तव त्यांच्या लक्षात येते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. यात हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. हे कटू सत्य हिंदु मुलींना समजावून सांगणे अजूनही कठीण होत आहे; कारण धर्मशिक्षणाचा अभाव ! हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आजही मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांच्यावर वरचढ ठरत आहेत. आज हिंदू त्यांच्या मुलांना सर्व सुखसुविधा पुरवतात; मात्र त्यांच्यावर योग्य संस्कार करणे टाळतात. त्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायातून थोडा वेळ काढून मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत. लव्ह जिहादपासून हिंदु मुलींचे रक्षण करतांना आपल्याला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. कायद्याच्या माध्यमातून आपण या धर्मांतराला आळा घालू शकतो. असे ठाम प्रतिपादन मध्यप्रदेश येथील हिंदु सेवा परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्री. अतुल जेसवानी यांनी केले. ते अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात बोलत होते.

श्री. जेसवानी पुढे म्हणाले, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी झोपडपट्यांमध्ये हिंदूंचे संघटन केले पाहिजे. ज्या भागात साधे दुचाकी वाहन जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी फार पूर्वीपासून ख्रिस्ती मिशनरी पोचलेले असतात. हे मिशनरी हिंदूंचे नाव धारण करून सेवेच्या नावाखाली धर्मांतर करत असतात. जबलपूर येथे एका संस्कृतीहीन संबंध पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला आम्ही विरोध केला. ही पार्टी आम्ही थांबवू शकलो नाही; मात्र या पार्टीमध्ये मद्यसेवनावर प्रतिबंध करू शकलो. अशाच प्रकारच्या मेजवानीचे जेव्हा दुसर्‍यांदा आयोजन करण्यात आले, तेव्हा आम्ही त्याला प्रखर विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी या मेजवानीला अनुमती नाकारली आणि ही मेजवानी रहित झाली. अशा सर्व मेजवान्यांचे आयोजक मुसलमान असतात.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या मार्गदर्शनामुळे धर्मकार्य शक्य !

हिंदूंवर होत असलेल्या आघातांच्या विरोधात हिंदु सेवा परिषद लढत असून आम्हाला चांगले यशही मिळत आहे. हे धर्मकार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या मार्गर्शनामुळे शक्य होते. जे मार्गदर्शन ही संघटना करते, ते ९० वर्षांची हिंदुत्ववादी संघटनाही करत नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *