Menu Close

आपत्काळाचा अपलाभ उठवणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांपासून सावध रहा ! – श्री. सागर कटवाल, नेपाळ

श्री. सागर कटवाल, नेपाळ

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर त्या संदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आपत्कालीन साहाय्य केले; मात्र या आपत्काळाचा अपलाभ उठवण्याचा प्रयत्न ख्रिस्ती मिशनर्‍यांनी अधिक प्रमाणात केला. त्यांनी भूकंपानंतर २ घंट्यांत सामाजिक संकेतस्थळावर नेपाळसाठी प्रार्थना करा !, असे आवाहन करून सहानुभूती मिळवली. आम्ही भूकंपपीडितांना साहाय्य केले; मात्र मिशनर्‍यांनी पीडितांच्या मुलांसाठी लगेचच तात्पुरत्या शाळा चालू केल्या. त्यांनी काही लोकांसाठी घरे बांधण्यास प्रारंभ केला. आम्हीही त्यांच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात साहाय्य केले; मात्र ख्रिस्त्यांनी नियोजनपूर्वक आपत्काळाचा अपलाभ उठवला. त्यामुळे अशा मिशनर्‍यांपासून सावध रहा, असे आवाहन नेपाळ येथील राष्ट्रीय हिंदू युवा आंदोलनाचे श्री. सागर कटवाल यांनी केले.

श्री. सागर कटवाल यांनी आवाहन केले की, नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र करण्यासाठी भारताने पाठिंबा द्यावा त्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व हिंदुत्ववाद्यांनी कटवालजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है । अशा घोषणा दिल्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *