Menu Close

गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला धर्माचे कार्य करणे शक्य होत आहे ! – जयराज सालियन, चिरंजिवी युवक मंडळ, दक्षिण कन्नड, कर्नाटक

जयराज सालियन, चिरंजिवी युवक मंडळ, दक्षिण कन्नड, कर्नाटक

विद्याधिराज सभागृह, रामनाथी : येथील अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाला संबाोधित करताना चिरंजिवी युवक मंडळाचे जयराज सालियन म्हणाले, चार वर्षांपूर्वी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संपर्कात आलो. त्यानंतर मला प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. तीन वर्षांपूर्वी बालसंस्कारवर्ग चालू केला. जवळच्या चार गावांतही बालसंस्कारवर्ग चालू आहे. आता आमच्या घरी धर्मशिक्षणवर्गही चालू केला आहे. आता आम्ही आमचे कार्यक्रम सनातन संस्थेने सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे करणे चालू केले आहे.

६ मास सतत पाठपुरावा करून आम्ही ख्रिस्ती युवकाच्या तावडीतून एका हिंदु युवतीला सोडवले. आता आम्ही अनेक हिंदुत्ववाद्यांना सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संघटित करत आहोत. गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला धर्माचे कार्य करणे शक्य होत आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *